Sunday, July 27, 2025
HomeसांगलीSangli : टेम्पो- कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर 7 जखमी

Sangli : टेम्पो- कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर 7 जखमी

सांगलीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. सांगली शहरातील आयर्विन पुलावर टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 ते 7 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयर्विन पुलावर टेम्पो आणि वॅगनार कारची समोरासमोर धडक झाली. टेम्पोमधून 12 जण शिरोळला भजनाच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या वॅगनार कार आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही गाड्यांच्या पुढच्या भागांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सात लोकं जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतांमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघाताचा तपास सांगली पोलिसांकडून सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -