Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगमुलगी बघा, लग्न करा आणि पगारवाढ सुद्धा घ्या ! भारतीय कंपनीची 'लग्नाळू'...

मुलगी बघा, लग्न करा आणि पगारवाढ सुद्धा घ्या ! भारतीय कंपनीची ‘लग्नाळू’ संघटनेला ‘जबरा’ ऑफर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले चांगल्या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण व्हावे. यानंतर चांगल्या जागी नोकरी मिळावी. लग्न करावे, पैसे कमवून घर संसार करावा. पोरा बाळांना सांभाळावे आणि आयुष्य सुंदर असावे. पण जर तुम्ही काम करत असलेल्या कंपनीनेच जर तुमचे लग्न लावून देण्यासाठी वधू किंवा वराला जोडीदार निवडण्यास मदत केली तर जीवनात खुप मजा येईल. एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असे करत आहे. त्यातही कुठली विदेशी कंपनी नसून स्वदेशी कंपनी आहे. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये या स्वदेशी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत मॅच मेकिंग सेवा (match making services) ऑफर दिली आहे.



जर तुम्ही लग्न केले तर तुमचा पगारही वाढवला जाईल…
एवढेच नाही तर या कंपनीने आपली प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी हा कोड क्रॅक केला आहे. या अंतर्गत जर कर्मचाऱ्यांनी लग्न केले तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. श्री मूकाम्बिका इंफोसोल्यूशंस (एमएसआई) Sri Mookambika Infosolutions (SMI) असे या कंपनीचे नाव आहे.



सध्या या कंपनीत ७५० पेक्षा अधिक लोक नोकरी करत आहेत. यातील जवळपास ४० टक्के लोक हे गेल्या ५ वर्षांपासून या कंपनीत नोकरी करत आहेत. २००६ मध्ये शिवकाशीत या कंपनीला लॉन्च करण्यात आले. कंपनी लोकांमध्ये प्रसिध्द झाली, मात्र यासोबतच योग्य आणि हुशार लोकांना कामावर ठेवणे ही कंपनीसाठी एक आव्हान बनले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -