ताजी बातमी ऑनलाईन टीम
बेनेडिक्ट कंबरबॅच (Benedict Cumberbatch) स्टारर हॉलीवूड चित्रपट ‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ (Doctor Strange 2) शुक्रवारी 6 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. मोठ्या पडद्यावर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाला मोठा झटका बसला आहे. डॉक्टर स्ट्रेंज 2 भारतात ऑनलाइन लीक (Doctor Strange 2 leak) झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एचडी क्वॉलिटीत लिक (Doctor Strange 2 HD leak) झाला आहे. बेनेडिक्ट वोंग, जोचिटल गोमेझ, मायकेल टू हॅलबर्ग आणि रॅचेल मॅकअॅडम्स यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. परंतु इंटरनेटवर लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ हा मार्व्हलच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस स्पायडर-मॅन: नो वे होम’ या चित्रपटानंतरच्या घटनांवर आधारित आहे. ‘स्पायडर मॅन: नो वे होम’ देखील भारतासह जगभरात सुपरहिट ठरला. परंतु आता निर्माते आणि कलाकारांसाठी एक वाईट बातमी आहे की डॉक्टर स्ट्रेंज 2 रिलीजच्या पहिल्याच दिवशी एचडी क्ल्वॉलिटीत ऑनलाइन लीक झाला आहे.
चित्रपट अचानक लीक झाल्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. डॉक्टर स्ट्रेंज 2 Tamilrockers, Telegram आणि Movierulz सह इतर पायरसी आधारित वेबसाइटवर लीक झाला आहे. सोशल मीडिया यूजर्स या वेबसाइट्सवरून मोठ्या प्रमाणात हा चित्रपट डाउनलोड करत आहेत. डॉक्टर स्ट्रेंज 2 चे दिग्दर्शक सॅम रॅमी यांनी एक उत्तम चित्रपट बनवला आहे यात शंका नाही. चित्रपट पाहण्यासाठी मार्व्हलचे चाहते मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचत आहेत. यावेळी या चित्रपटात चाहत्यांनाही भीती वाटू शकते. कारण बेनेडिक्ट कंबरबॅचचा भयानक लूक चित्रपटात पाहायला मिळणार आहे.