Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्रलग्नाच्या बस्त्याला आलेल्या तरुणीला पाण्याऐवजी दिली 'ही' बाटली, आणि घोळ झाला

लग्नाच्या बस्त्याला आलेल्या तरुणीला पाण्याऐवजी दिली ‘ही’ बाटली, आणि घोळ झाला

सध्या लग्नसराई सुरु असून सर्वत्र खरेदीची लगबग आहे. अशातच पंढरपूरमधून (Pandharpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झालं असे की, लग्नाचा बस्त्याची खरेदी करण्यासाठी कापड दुकानात गेलेल्या एका तरुणीला चक्क फरशी पुसण्याचे केमिकल प्यायला दिल्याची घटना घडली आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे लग्नाचा बस्ता तसेच इतर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. कपडे दुकानात सर्वाधिक गर्दी होत आहे. अशात पंढरपूर शहरातील अविष्कार या कापड दुकानात गोपाळपूर येथील एक कुटुंब लग्न ठरलेल्या तरुणीसह लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेले होते. खरेदी सुरु असताना तरुणीला तहान लागली म्हणून तिने दुकानात असलेल्या कामगाराकडे पाणी मागितले.

कामगाराने तरुणीला बाटली दिली. पण या बाटलीत पाणी नाही तर फरशी पुसण्यासाठीचे लायझल केमिकल ठेवलं होतं. कर्मचाऱ्याने चुकून ती बाटली पाणी म्हणून त्या तरुणीला दिली. पाणी समजून या तरुणीने देखील बाटली तोंडाला लावली. मात्र, केमिकलमुळे तिच्या घशात जळजळ होऊ लागल्याने हे केमिकल असल्याचे लक्षात आले.

या घटनेनंतर त्या तरुणीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर आहे. घटनेबाबत पंढरपूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली बाळगा
सध्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. काही ठिकाणी तापमान 47 अंशापर्यंत पोहचले आहे. जीवाची लाहीलाही या उन्हामुळे होत असून नागरिक हैराण झाले आहे. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत खुप तहन लागते. अशा वेळी शरीराला पाण्याची गरज असते. पंढरपूर येथील घटना लक्षात घेता घराबाहेर पडताना स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवावी. जेणे करून पंढरपूर सारखा प्रकार तुमच्यासोबत घडणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -