Sunday, December 22, 2024
Homenewsमघा नक्षत्राला सुरुवात; पिकांची स्थिती चांगली राहील....

मघा नक्षत्राला सुरुवात; पिकांची स्थिती चांगली राहील….

पावसाच्या मघा नक्षत्राला सुरुवात; पिकांची स्थिती चांगली राहील

मघा नक्षत्राला १६ ऑगस्टच्या रात्री १ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन “गाढय” आहे.
पावसाच्या मघा नक्षत्राला सुरुवात पिकाची स्थिती चागली राहील

या नक्षत्रात बेताचाच पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मघा नक्षत्राला १६ ऑगस्टच्या रात्री १ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन “गाढव” आहे.
सूर्याच्या नक्षत्रकालीन प्रवेश वेळेतील ग्रह स्थितीनुसार, या नक्षत्रात पिकांना मानबनान्या सार्वत्रिक पावसाचे योग दिसून येतात.

परंतु या नक्षत्रातही बेताचाच पाऊस असेल. परंतु, पिकांची स्थिती चांगली असेल. या नक्षत्राचे पहिले व दुसन्या चरणात अर्थात १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान चांगल्या पावसाचे योग आहेत.


मागच्या आश्लेषा नक्षत्रात आभाळ आभ्राच्छादित राहिले, पण पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी मागील नक्षत्रातील १४ दिवस, पावसाविनाच गेले. याचा सोयाबीन पिकाला फटका बसला. या आधी मृगाचे वाहन ही “गाढवाचं” होते. त्यावेळी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे “मघा” नक्षत्रातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. परंतु मघा नक्षत्रासाठीच्या “आला तर मघा – नाही तर वरते बघा”. या प्रचलित म्हणीप्रमाणे हे नक्षत्र चांगले बरसते की, पावसासाठी आकाशाकडे बघायला लावते हे येणारा काळच सांगू शकेल. शेतकरी नेहमीच आशेवरच जगत असतो. त्यामुळे शेतकरी या नक्षत्रात चांगल्या पावसाची मागणी देवाजवळ करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -