Thursday, October 3, 2024
Homenewsरियलमीच्या पहिल्या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा

रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा

ट्वीटर युजर @TechTipster ने रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा झाला आहे.


रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपच्या किमतीचा खुलासा, Reaims Bookslim देणार का Mi Notebook ला टम्बार शाओमी, विवो आणि रियलमी या स्मार्टफोन निर्माता कंपन्या सध्या लॅपटॉप सेगमेंटकडे वळत आहेत.

लवकरच रियलमीचा Realme Book (slim) लॅपटॉप बाजारात येणार आहे. हा लॅपटॉप सर्वात आधी चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर भारतात देखील रियलमीचा पहिला लॅपटॉप सादर केला जाणार आहे. आता रियलमीच्या या आगामी लॅपटॉपचा टीजर पोस्टर लीक झाला आहे.

ट्वीटर युजर @TechTipster. ने रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा झाला आहे.


Realme Book (slim) लॅपटॉपची किंमत
टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार Realme Book (slim) लॅपटॉप चीनमध्ये 4,699CNY (सुमारे 54,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. भारतात या लॅपटॉपची किंमत 55 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. Realme Book (slim) मध्ये 14-इंचाचा 2K WQHD डिस्प्ले 3:2 अस्पेक्ट रेश्योसह देण्यात येईल. रियलमी लॅपटॉपमध्ये कंपनी 11th Gen Intel Core i5-1135G7 प्रोसेसर देणार आहे. त्याचबरोबर 16GB DDR4 रॅम, 512GBSSD स्टोरेज आणि 11 तास बॅटरी बॅकअप मिळू शकतो.


Realme Book लाँच डेट Realme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल. या लॅपटॉपसोबत कंपनी एक टॅबलेट देखील लाँच करू शकते, जो Realme Pad नावाने बाजारात येईल. Realme Pad टॅबलेट कंपनीच्या लॅपटॉप रियलमी बुकसोबतच 18 ऑगस्टला सादर होईल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -