Friday, February 27, 2026
Homeसांगलीमिरज : हरिप्रिया एक्स्प्रेसवर दगडफेक ; सराईत गुन्हेगारास अटक

मिरज : हरिप्रिया एक्स्प्रेसवर दगडफेक ; सराईत गुन्हेगारास अटक

मिरज रेल्वे स्थानकात तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेसच्या इंजिनवर दगडफेक करून काच फोडली. याप्रकरणी नदीम ऊर्फ खलनायक आजम खतीब (वय 25, रा. बुधवार पेठ, मिरज) याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. कोल्हापूर-तिरूपती एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी मिरजेत आली. त्यानंतर ती कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी इंजिन दुसर्या बाजूला जोडण्यात येत होते.

यावेळी नदीम खतीब हा रेल्वेस्थानक परिसरात आपल्या हातात चाकू घेऊन फिरत होता. इंजिन पाहून त्याने अचानक इंजिनवर दगड मारून काच फोडली. याबाबत रेल्वे चालकाने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. चालकाने सांगितलेल्या वर्णनावरून सहायक पोलिस उपनिरीक्षक राजाराम पाटील यांनी खतीब यास नशेत स्थानक परिसरात फिरत असताना मध्यरात्री अटक केली. त्याच्याकडून धारधार चाकू जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे.

खतीब हा नेहमी रेल्वे स्थानक परिसरात वावरत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने शंभरफुटी रस्ता येथे एका तरुणीवर देखील चाकूहल्ला केला होता. रेल्वे स्थानक परिसरात लुटमार, मारामारीच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात नशेखोर आणि चहा विक्रेत्यामध्ये मारामारी सुरू असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने मध्यस्थी केली होती. त्यावेळी नशेखोराकडून सुरक्षा जवानालाच शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता.आता नशेखोराने थेट रेल्वे इंजिनवर दगडफेक करून काच फोडल्याने रेल्वे स्थानक परिसरातील नशेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -