Saturday, July 5, 2025
Homeमनोरंजनपुष्पा 2.0 बघाय लागतंय...

पुष्पा 2.0 बघाय लागतंय…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मित्रांनो पुष्पा चित्रपट आपण सगळयांनी एकदा नवे दोन दोनदा बघितलाय आपला पुष्पा भाऊ म्हणजे अल्लो अर्जुन यान अख्खा महिना थियटर गाजविलाय. पण तो पुष्पा भाऊ होता फ्ढक्त चित्रपटात. असाच एक पुष्पा खरोखरच अवतरलाय. पुष्पा 2.0 म्हणजे आपण बोलतोय युपेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या बद्दल.
कितीतरी दिवस उलटले तरी त्यांनी पाय माग घेतला नाय. झुकेगा नाय. असं म्हणत आपला लढा सुरूच ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांना युक्रेनच्या सगळया लोकांनी पाठिंबा दिला आहे. पुतिन यांनी या छोटयाशा देशाचे येवढे नुकसान केले तरीबी ते मागे सरले नाहीत. एक ना एक दिवस आपला ऐईल या विश्वासाने युक्रेन बलाढय रशियाशी रात्रंदिवस झुंझत आहे. दारू गोळा कमी पडतोय असं समजताच देशातील प्रत्येक नागरिक पेट्रोल बॉम्ब तयार करत आहेत. त्याचबरोबर परदेशात असलेले युक्रेनचे लोक आपल्या देशाच्या मदतीला धावून आले. त्यांनी आपल्याला जमेल तेवढी आर्थिक मदत केली आहे.



ते सगळ ठिक आहे वो, पण रशिया आणि युपेनमध्ये चाललेल्या युद्धादरम्यान चर्चा होतेय ती एका कॉमेडियनची. तुम्ही म्हणत असाल युध्दात कॉमेडीयन कसं काय ? त्याचा युद्धाशी काय संबंध ? तुम्हाला वाटत असेल युध्दा आणि स्टँडप कॉमेडी याचा सुताचाबी संबंध लागत नाही. पण संबंध आहे बर का. अनिल कपुर यांच्या नायक चित्रपटातील हिरो सारख युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी जगासमोर एक नवा पायंडा पाडलाय. त्यांचा प्रवास स्टँडप कॉमेडियन ते युपेनचे राष्ट्रपती असा राहिलाय.
वोलोदिमीर जेलेस्की यांचा जन्म 25 जानेवरी, 1978 ला युक्रेनमध्ये झाला. यांचे वडील प्रोफेसर आणि आई पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु नेहमीप्रमाणे वडिलांची परवानगी दिली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -