Saturday, July 26, 2025
Homeब्रेकिंगDharmaveer : आनंद दिघंच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं! सिनेमा अर्धवट...

Dharmaveer : आनंद दिघंच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं! सिनेमा अर्धवट सोडून थिएटरबाहेर

ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाण्यातील एक आघाडीचं नाव असलेले आनंद दिघे (Aanand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत असलेला धर्मवीर चित्रपट (Dharmaveer Marathi Movie) रिलीज झाला. त्यानंतर आता चित्रपटाबाबत एक रंजक किस्सा मुंबईत पाहायला मिळाला. हा चित्रपट पाहायला गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चित्रपटाचा शेवट न पाहताच चित्रपटगृहातून बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवटचा सीन न पाहता बाहेर थिएटरबाहेर आलेल्या उद्धव ठाकरेंना पाहून सगळे अवाक् झाले. त्यांनी नेमकं असं का केलं, याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.



आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळलंय. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही कारण आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर एक आघात होता, असंही ते म्हणालेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -