Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर बैलगाडी शर्यतीत हरण्याची बाजी

कोल्हापूर बैलगाडी शर्यतीत हरण्याची बाजी

ताजी बातमी ऑनलाईन टीम


कळंबा (ता. करवीर) गावच्या यात्रेनिमित्त रविवारी झालेल्या बैलगाडी शर्यतीत जनरल गटामध्ये संदीप पाटील यांच्या हरण्याने बाजी मारली. तर ब गटामध्ये प्रसाद संकपाळ यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना करवीरचे नायब तहसीलदार विजय जाधव, गावचे सरपंच सागर भोगम यांच्या हस्ते रोख रक्कम, ढाल, निशान देवून सन्मानित करण्यात आले.
तुफान ग्रुपतर्फे कळंबा गावच्या यात्रेनिमित्त कळंबा तलाव येथे रविवारी बैलगाडी शर्यतीचे रितसर आयोजन केले होते.


जनरल गटामध्ये सात तर ब गटात पाच गाडीवानांनी सहभाग नोंदवला. तलाव परिसरात झालेल्या या बैलगाडी शर्यतीच्या थरारामध्ये जनरल गटात जुना बुधवार पेठेतील संदीप पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम, तर कळंबा येथील पांडू खानविलकर आणि उमेश निकम यांच्या बैलजोडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ब गटामध्ये प्रसाद संकपाळ यांच्या बैलजोडीने प्रथम तर पाडळीच्या ओंकार पाटील यांनी द्वितीय आणि कळंबा येथील पांडू खानविलकर यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळविला. जनरल गटातील विजेत्यांना अनुक्रमे एकवीस, पंधरा आणि दहा हजार रुपये रोख, ढाल व निशान आणि ब गटामधील विजेत्यांना अनक्रमे पाच, तीन आणि दोन हजार रुपये ढाल, निशान देऊन सन्मानित केले. स्पर्धेचे नियोजन ग्रुपचे अध्यक्ष पै. अमोल पाटील, रितेश तिवले, उमेश तांदळे, प्रवीण पाटील, विशाल तिवले, नीलेश चौगले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -