Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत नवविवाहितेने चार तोळे सोने, पन्नास हजाराची रोकड घेऊन पलायन

इचलकरंजीत नवविवाहितेने चार तोळे सोने, पन्नास हजाराची रोकड घेऊन पलायन

ताजी बातमी ऑनलाईन टीम
विवाहानंतर महिन्याभरातच नवविवाहितेने ४ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजाराची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात सिमा जगदीश मोदानी (वय ४३), माधुरी शशिकांत चव्हाण (वय ३४ दोघे रा. कबनुर), शहिदा सरदार बारगीर, फारुख सरदार बारगीर (दोघे रा. रुई), रेखा नामदेव घाटगे (सध्या रा. जयसिंगपुर मुळ रा. मायणी जि. सातारा) या पाचजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोद अशोक उत्तुरे (रा.लक्ष्मी माळ कबनुर) यांनी तक्रार दिली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी, सीमा मोदानी, माधुरी चव्हाण, शहिदा बारगीर, फारुख बारगीर हे चौघेजण वधु-वर
सुचकाचे काम करतात. विनोद उत्तुरे हे लग्नासाठी मुली बघत असल्याची माहिती फारुख बारगीर व रेखा घाटगे यांना मिळाली. त्यांनी उत्तुरे यांना भेटुन रेखा घाटगे यांचे स्थळ दाखवून लग्नाची बोलणी करत विवाह करून दिला. लग्नाची फी म्हणून आरोपी यांनी फिर्यादीकडून ५० हजार रुपये घेतले. तर लग्नात विनोद उत्तुरे यांनी रेखा घाटगे हिस अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र तसेच पुजेच्या दिवशी घरातील तीन तोळे सोन्याचे घंटण व अर्ध्या तोळ्याचे कानातील सोन्याचे झुबे दिले होते.


लग्राच्या महिन्याभरानंतर रेखा घाटगे ही विनोद उत्तुरे यांचे सोबत माहेरी जाते असे सांगून जयसिंगपुर बसस्थानक येथून कोठेतरी निघून गेली. उत्तुरे यांनी य संदर्भात उपरोक्त चौयांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर उत्तुरे यांनी रेखा घाटगे ही बेपत्ता असल्याची फिर्याद जयसिंगपुर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी शोध घेऊन रेखा घाटगे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत घाटगे हिने माझे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद उत्तुरे यांनी पाचजणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सपोनि रोहन पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -