Friday, November 22, 2024
HomeबिजनेसLIC ची शेअर बाजारात एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांची निराशा

LIC ची शेअर बाजारात एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांची निराशा

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ अर्थात LIC ने शेअर बाजारात (Share Market) एन्ट्री (LIC IPO Listing) केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांची (LIC Investors) निराशा झाली. शेअर बाजारात लिस्ट होताच देशातील सर्वात मोठा LIC चा IPO BSE आणि NSE वर 12 टक्क्यांनी खाली आला. LIC शेअर सूचीबद्ध झाला असून सध्या तो 8.50 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या LIC चा शेअरचे व्यवहार 867.20 रुपयांवर सुरू आहे.

यापूर्वीच शेअर मार्केट एक्सपर्ट्सनी LIC शेअर्सची घसरणीसह सुरूवात होऊ शकते, असे भाकीत वर्तवले होते. आता हे भाकीत खरे ठरले आहे.

LIC चा स्टॉक BSE वर 81.80 रुपये म्हणजेच 8.62 टक्क्यांच्या घसरणीसह 867.20 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्याचवेळी NSE वर LIC चा स्टॉक 77 रुपयांच्या घसरणीसह 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळाले.

सुमारे 20,557 कोटी रुपयांचे मुल्य असलेल्या LIC IPO ला देशांतर्गत गुंतवणुकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या शेअरसाठी सरकारने 949 रुपये प्रति शेअर मुल्य निश्चित केले होते. LIC पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणुकदारांना अनुक्रमे रु. 889 आणि रु. 904 प्रति शेअर वाटप करण्यात आले होते.

दरम्यान, LIC चा IPO 9 मे रोजी बंद झाला होता. 12 मे रोजी बोली लावल्यानंतर त्याचे शेअर वितरित करण्यात आले होते. सरकारने IPO द्वारे LIC मध्ये 22.13 कोटी पेक्षा जास्त शेअर्स म्हणजेच 3.5 टक्के स्टेक ऑफर केले आहेत. यासाठी किंमत श्रेणी 902-949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.
LIC चा IPO जवळपास तीन वेळा सबस्क्राइब झाला होता. यामध्ये देशांतर्गत गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मात्र, विदेशी गुंतवणुकदारांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -