ताजी बातमी ऑनलाईन टीम
सध्या ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रातही हाच मुद्दा चर्चेत आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ज्ञानवापी मशिदीचे तीन दिवसांचे सर्वेक्षण केले. आता सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करावा लागेल. त्यानंतर न्यायालय निर्णय देईल. दरम्यान, सर्वेक्षणादरम्यान मशिदीमध्ये शिवलिंग सापडले आहे असा दावा हिंदू पक्षाने केला आहे, तर मुस्लिम पक्षाने हे दावे फेटाळले आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयापासून (Allahabad High Court) ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Supreme Court) अनेक दावे करण्यात आले होते. त्यानुसार 16व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने (Aurangjeb) काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) पाडून ज्ञानवापी मशीद बांधली होती. हा वाद अनेक वर्षांपासून असल्याने त्याला अनेक कांगोरे देखील आहेत. जाणून घेऊया हा सगळा वाद नेमका काय आणि कधी काय घडले…
काय आहे ज्ञानवापी प्रकरण?
खरं तर, 1991 मध्ये स्थानिक पुजाऱ्यांनी वाराणसी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापी मशीद परिसरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी म्हटले की 16व्या शतकात औरंगजेबाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून तेथे मशीद बांधण्यात आली. खरे तर काशी विश्वनाथ मंदिर माळवा राजघराण्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. औरंगजेबच्या आदेशानुसार मंदिराचा काही भाग पाडून तेथे मशीद बांधण्यात आली असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. मशिदीच्या आवारात हिंदू देवतांच्या मूर्ती असून त्यांना ज्ञानवापी मशिदीच्या आवारात पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हा मुद्दा 1991 पासून वेळोवेळी उपस्थित केला जात होत मात्र आत्ताएवढे मोठे स्वरूप याने कधीच घेतलेले नाही. या प्रकरणाची सुनावणीही अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे.