ऑनलाईन जगात आपण स्मार्टफोन्सवर जास्त लक्ष देत असतो. आपल्या बजेटमध्ये असो किंवा नसो आपण आपल्याला आवडलेला स्मार्टफोन नक्की खरेदी करतो. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पैसे कमी असले की ईएमआय चा पर्याय आजकाल उपलब्ध असतो. पण आपली डिजिटल होण्याची हौस आपण भागवतो. पण काही लोकांना तरीही बजेटचा प्रॉब्लेम येतो अशा लोकांसाठी जिओफोनचा पर्याय ते निवडतात. आता हाच जिओफोन स्वस्तात मिळत आहे. कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
बजेटपेक्षाही कमी किंमतीत करा खरेदी..
अल्पावधीत लोकप्रिय झालेली, करोडो वापरकर्ते बनवलेली आणि देशात टेलिकॉम क्षेत्रात एअरटेल, व्हीआय सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करत उत्कृष्ट सेवा देणारी कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. मोबाईल क्षेत्रात उतरल्यानंतर अनेक जिओफोन कंपनीने लाँच केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच लाँच झालेला JioPhone Next स्मार्टफोन जेव्हा लाँच झाला होता, तेव्हा जिओने हा जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं होतं.
जिओ कंपनीनं जिओफोन नेक्स्ट जरी स्वस्तात लाँच केला असला तरी आता कंपनीने आणखी 2000 रुपयांची ऑफर ठेवली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या फोनसाठी जिओने दिग्गज टेक कंपनी गुगलशी पार्टनरशिप केली होती. तसेच क्वॉलकॉम कंपनीच्या प्रोसेसरचा या फोनमध्ये वापर करण्यात आला होता. आता प्रथमच JioPhone Next वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्हाला हा फोन करायचा असेल तर तुम्हाला तो फक्त 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.
माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी जेव्हा JioPhone Next लॉन्च झाला तेव्हा तो भारतात 6,499 रुपयांमध्ये लाँच झाला होता. आता या स्मार्टफोनवर जिओकडून 2,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. जर तुम्हालाही या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जुना 4G फोन किंवा फिचर फोन असला तरी तो देऊन तुम्ही हा नवीन फोन एक्सचेंज करून फक्त 4499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. लाँचनंतर पहिल्यांदाच जियोफोन नेक्स्टवर असा डिस्काउंट दिला जात आहे.
जिओफोन नेक्स्ट मध्ये 5.45-इंचाचा (720 X 1440 पिक्सल) एचडी डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास-3 सह येत आहे. JioPhone Next मध्ये 2 GB RAM आणि 32 GB इंटरनल मेमरी मिळते. फोनमधील ही मेमरी तुम्हाला 512GB पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. यामुळे अधिक मेमरी लागत असल्यास तिची आवश्यकता पूर्ण होईल. यासोबतच फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन क्यूएम 215 चिपसेट दिला आहे. ज्याने स्मार्टफोनचा स्मूथ वापर होईल.