Home कोल्हापूर कोल्हापूर : ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन वादावादी, दोघांवर चाकू हल्ला

कोल्हापूर : ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन वादावादी, दोघांवर चाकू हल्ला

0

ताटात रस्सा पडल्याच्या कारणातून वाद होऊन दोघांवर चाकू हल्ला झाला. या घटनेत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहिद शेख उर्फ ओंकार माने (वय 25), अमीन पटेल (वय 24, दोघे रा. औरवाड, ता.शिरोळ) अशी जखमींची नावे असून, सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली असून, याप्रसंगी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेडशाळ (ता. शिरोळ) येथील हॉटेल समाधान ढाबा येथे संशयित तिघे व जखमी ओंकार माने व अमीन पटेल हे जेवायला बसले असताना एकमेकाला धक्का लागल्याने, ताटात रस्सा पडल्याने वाद झाला. या वादावादीचे मारामारीत रूपांतर झाले. तिघांपैकी एकाने खिशातील कटरने माने आणि पटेल वर वार करून त्यांना जखमी केले.

जखमी दोघांना सांगली येथील डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सपोनि बालाजी भांगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तणावपूर्ण वातावरण असल्याने औरवाड परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी पहाटे घटनास्थळी व कुरुंदवाड पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली.