सोनं खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यात किमती 50 हजारांच्या खाली आल्या आहेत. अमेरिकन सेंट्रल बँक फेड रिझर्व्हचे नेते जेरोम पॉवेल यांनी महागाई नियंत्रणात आणण्याच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात परत तेजी येताना दिसत आहेत. तर विक्री बंद झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून आला आणि लग्नसराईतही सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली आला आहे.
मल्टीकमोडीटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत बुधवारी सकाळी 284 रुपयांनी वाढून 49,889 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सकाळी, एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर 50,120 वर उघडला आणि व्यवहार सुरू झाला. परंतु, वाढलेली विक्री आणि कमी मागणी यामुळे लवकरच दर 0.57 टक्क्यांनी घसरला आणि फ्युचर्सची किंमत 50 हजार रुपयांच्या खाली गेली.(gold price news) सोन्याच्या धर्तीवर आज सकाळी चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली. मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 518 रुपयांनी घसरून 60,338 रुपये किलो झाला. याआधी एक्सचेंजमध्ये चांदीची किंमत 60,752 वर उघडली आणि व्यवहार सुरू झाला. पण मागणी कमी झाल्याने आणि वाढलेली विक्री यामुळे काही काळानंतर फ्युचर्सचे भाव 0.85 टक्क्यांनी खाली आले आणि 60 हजारांच्या आसपास व्यवहार सुरू झाले.
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सकाळच्या व्यवहारात, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,809.58 डॉलर प्रति औंस होती, जी मागील किंमतीपेक्षा 0.28 टक्क्यांनी कमी होती. त्याच धर्तीवर, चांदीच्या दरातही घसरण झाली आणि स्पॉट किंमत 0.46 टक्क्यांनी घसरून 21.53 डॉलर प्रति औंस झाली. गेल्या महिन्यापर्यंत 72 हजारांच्या आसपास चांदीची विक्री होत होती.
अमेरिकन सेंट्रल बँक फेड रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी एक दिवसापूर्वीच असे विधान केले होते की, महागाई नियंत्रणात येईपर्यंत व्याजदर वाढवले जातील. या वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास परतताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याला सुरक्षित ठिकाण मानणारे गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळू लागले आहेत, त्यामुळे सोन्याची मागणीही कमी होत आहे.