Wednesday, August 27, 2025
Homeसांगलीसांगली: अखेर बहुचर्चित शिक्षणाधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे निलंबित

सांगली: अखेर बहुचर्चित शिक्षणाधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे निलंबित

मिरज / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी विष्णू मारुती कांबळे व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांना निलंबित केले.विभागीय शिक्षण आयुक्त सूरज मांडरे यांनी ही कारवाई केली आहे.या दोघांना तीन शिक्षणाकडून १ लाख ७० हजारांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

तीन शिक्षकांनी वेतनश्रेणी मिळविण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे यांच्याकडे सादर केला होता.हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कांबळे व सोनवणे यांनी पदाचा गैरवापर करत प्रत्येकी ६० हजार प्रमाणे १ लाख ७० हजारांची मागणी केली होती.पैसे दिले तरच प्रस्ताव पास होतील असे त्यांनी सांगितले.त्यामुळे शिक्षकांनी २६ एप्रिल रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

या विभागाच्या पथकाने तेव्हापासून ते २ मे पर्यंत चौकशी केली.त्यावेळी कांबळे व सोनवणे यांनी लाच मागितल्याचे निष्पण झाले होते.१ लाख ७० हजार रुपये लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली.कांबळे यांच्या घरातून १० लाख रुपये आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.तर सोनवणे यांच्या घरात ३ लाख रुपये सापडले.हा प्रस्ताव लाच लुचपत प्रतिबंधक यांनी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता.त्यानंतर त्यांना आज दोघांना निलंबित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -