Wednesday, August 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : हेरवाड येथील गायकवाड कुटुंबीयांनी केली विधवा प्रथा बंदी निर्णयाची अंमलबजावणी

कोल्हापूर : हेरवाड येथील गायकवाड कुटुंबीयांनी केली विधवा प्रथा बंदी निर्णयाची अंमलबजावणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशात स्वागत होत आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजाने विधवा प्रथा बंदच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. पती मृत झाल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे अशा कुप्रथा बंद करून निर्णायक पाऊल उचलल्यामुळे या लढ्याला यशस्वी करण्यासाठी चर्मकार समाजाने पहिले पाऊल उचलले आहे.



हेरवाड येथे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला; पण तो अंमलात आणणे तेवढेच आव्हानात्मक आहे. मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगोंडा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व चर्मकार समाजातील पदाधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी केली आहे. हेरवाड येथील विष्णू गायकवाड (वय ६० ) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. पदाधिकाऱ्यांनी माने यांच्या घरी जावून विधवा प्रथा बंदीबाबत प्रबोधन केले. महिलांना सर्वांबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे चर्मकार समाजाने ही प्रथा बंद करुन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -