Monday, February 23, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! दिवसाढवळ्या सराफावर चाकू हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद  

धक्कादायक! दिवसाढवळ्या सराफावर चाकू हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद  

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुण्यामध्ये एका सराफ व्यापाऱ्याच्या दुकानात शिरुन चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. महत्वाचे म्हणजे दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चाकू हल्ल्यामध्ये सराफ व्यापारी गंभीर जखमी झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगरमध्ये ही घटना घडली आहे. वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्वलर्समध्ये हल्लेखोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. हा बराच वेळ तो ज्वेलर्समध्ये बसून राहतो. त्यानंतर कोणी येत नाही हे पाहत तो बॅगेतून चाकू काढतो आणि सराफावर हल्ला करतो. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सराफाने प्रतिकार केला. त्याने बऱ्याचदा चाकू हल्ला चूकवण्याचा प्रयत्न केला. तसंच हल्लेखोराच्या हातातून चाकू हिसकावणयाचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये सराफ गंभीर जखमी झाला.

 

हल्ल्यानंतर हल्लेखोराने त्याठिकाणावरुन पळ काढला. ही संपूर्ण घटना ज्वेलर्समध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर सध्या गंभीर जखमी झालेल्या सराफावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तर याप्रकरणी हल्लेखोराविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -