Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाMI vs DC IPL2022: MI च्या टिम डेविड कृपेने RCB प्लेऑफमध्ये,दिल्लीचा खेळ...

MI vs DC IPL2022: MI च्या टिम डेविड कृपेने RCB प्लेऑफमध्ये,दिल्लीचा खेळ खल्लास


मुंबई: IPL 2022 मध्ये एका महत्त्वाच्या सामन्यात वर विजय मिळवला. मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. रमणदीप सिंहने चौकार ठोकून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सच्या आजच्या विजयाचा नायक पुन्हा एकदा टिम डेविड आहे. टिम डेविडने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. टिम डेविडने 11 चेंडूत 34 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते.

मुंबईच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झालाय. दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. दिल्लीने विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबईने 19.1 षटकात हे लक्ष्य पार केलं. सामना रोमांचक स्थिती मध्ये असताना टिम डेविड आला. त्याने फटकेबाजी केली व सर्व गणितचं बदलून टाकलं. आज पुन्हा एकदा मोक्याच्याक्षणी डेविड आऊट झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -