ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर- येथील रेल्वे ब्रीज वरुन महिलेने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे कर्मचारी च्या सतर्कतेमुळे आणि रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे महिलेचा प्राण वाचला. ही घटना शनिवार सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. कोल्हापूर ते मिरज मार्गावरील कृष्णां नदीवरील उदगाव ब्रिजजवळ घडली. ही महिला धरणगुत्ती ता. शिरोळ येथील असून तिचे नाव कमल रतन बागडे वय ५५ असल्याचे समजते. याबाबत या महिलेच्या मुलास फोनवरून माहिती दिली. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक महिला उदगाव येथील कृष्णा नदीवरील रेल्वे ब्रीज वरुन धावत जात होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला खालून थांबण्याची विनंती केली. मात्र तिने न ऐकताच तिथूनच खाली उडी मारली. खाली मातीवर पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली होती. तात्काळ कर्मचाऱ्यांनी १०८ एम्बुलेंस सेवेला फोन केला. अॅम्बुलन्स पायलट पांडुरंग ठोमके तसेच डॉ. भारती वनमोरे यांनी जयसिंगपूर पोलीस तसेच उदगावचे पोलीस पाटील अनुराधा कांबळे व त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य दिलीप कांबळे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून त्या महिलेला रस्त्यावर आणत रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल केले. महिलेला वेळेत उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. रूगनवाहिकेच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले त्याबद्दल सर्वांचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. ही महिला धरणगुत्ती ता. शिरोळ येथील असून तिचे नाव कमल रतन बागडे वय ५५ असल्याचे समजते. याबाबत या महिलेच्या मुलास फोनवरून माहिती दिली. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.