ताजी बातमी ऑनलाईन टीम
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta) चाहत्याच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र खळखळून हसवण्यास भाग पाडते. तर दरम्यान, मालिकेतील कलाकारांच्या बद्दल नवनवीन अपडेटस समोर येत आहेत. या मालिकेतील गेल्या काही दिवसांत ‘तारक मेहता’ ची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढाने आणि दयाबेन म्हणजे, दिशा वाकाणीने शो सोडला होता. तर सध्या बबिताजी देखील या शोतून बाहेर पडत असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये ( Taarak Mehta ) ‘बबिताजी’ ची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हा शो सोडणार आहे. लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटीचा भाग बनत असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. याशिवाय बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांनी मुनमुनला शोचा भाग होण्यासाठी संपर्क साधल्याचे समजते. परंतु, या वृत्ताबद्दल निर्मात्याकडून किंवा मुनमुन दत्ताकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.