Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररेल्वे बोर्डाकडून लोकलबाबत मोठा निर्णय लोकलमध्ये बसवणार कॅमेरे ( अधिक माहिती...

रेल्वे बोर्डाकडून लोकलबाबत मोठा निर्णय लोकलमध्ये बसवणार कॅमेरे ( अधिक माहिती जाणून घ्या )

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रेल्वे बोर्डाकडून लोकलबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे आता मोटरमनच्या (Motorman) कॅबमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा बसवण्यात येणार आहे. कॅबच्या आतून आणि बाहेरून अशा दोनही बाजूनं सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे लोकल चालवताना वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, सिग्नल तोडणे अशा प्रकाराला आळा बसणार आहे. अनेकदा वेगाच्या मर्यादेवर नियंत्रण न ठेवल्याने किंवा सिग्नल तोडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळल्या जाव्यात यासाठी आता मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहोत. मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी अंदाजे दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही प्रणाली सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील (Central Railway) काही लोकलमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्प्याने सर्वच लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.



दिवसभरात तीन हजार फेऱ्या मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसभरात लोकलच्या तीन हजारांपेक्षा अधिक फेऱ्या होतात. लोकलचे वेळापत्रक हाताळण्यासाठी रेल्वेकडे स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन यंत्रणा आहे. परंतु अनेकदा मोटरमनकडून वेगावर नियंत्रण राखले जात नाही. सिग्नलचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. मात्र जर मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमरा बसवण्यात आल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने अशा घटनांना आळा बसू शकतो. अपघात टाळण्याच्या दृष्टीने रेल्वेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानण्यात येत
आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -