Tuesday, December 24, 2024
Homeसांगलीदुचाकीच्या भीषण धडकेत तीन ठार; दोन गंभीर

दुचाकीच्या भीषण धडकेत तीन ठार; दोन गंभीर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दवी घटना पाटण तालुक्यातील नवारस्ता ढेबेवाडी मार्गावर सांगवड पुलानजीक रविवारी रात्री उशिरा घडली.


याबाबतीत घटनास्थळावसून समजलेल्या माहितीनुसार, येरफळे ता. पाटण येथील बबन धोंडीराम पडवळ (वय 65) आणि त्यांचेच पुतणे भरत रामचंद्र पाटील (वय 40) आणि अन्य एक जण हे तिघे सेंट्रिंगच्या कामावर गेले होते. रविवारी रात्री काम संपवून दुचाकीवरून परत येत असताना सांगवड येथील पुलाजवळ समोरून नवारस्ताकडून भरघाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये समोरच्या गाडीवरील नितीन बबन तिकुडवे (वय 36) रा. शिंदेवाडी ता. पाटण हा युवक जाग्यावरच ठार झाला, तर भरत पाटील आणि बबन पडवळ यांचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात इतका भीषण होता की अपघात स्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता. इतर आणखी दोन जण गंभीर असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास सहाययक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -