Friday, July 25, 2025
Homeब्रेकिंगइंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द, तब्येतीच्या कारणास्तव...

इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द, तब्येतीच्या कारणास्तव ब्रेक

ताजी बातमी ऑनलाईन टीम
आपल्या महाराष्ट्राला किर्तनकारांची (Kirtan) एक मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने अनेक बडे किर्तनकार पाहिल आहे. निवृत्ती महाराज इंदोरीकर हेही त्यापैकीत एक किर्तनकार आहेत अलिकडच्या काळात किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indorikar Maharaj) प्रचंड गाजले. इंदोरीकर महाराजांची लोकप्रियता पाहून अनेकजण आवाक राहतात. इंदोरीकर महाराजांना ऐकायला अजूनही मोठी गर्दी जमते.


इंदोरीकरांच्या भाषणातला तो विनोदी (Comedy) बाज आणि ग्रामीण हटके स्टाईल बोलणं अनेकांना भावतं. त्यामुळे त्यांच्या किर्तनच्या तारखा अनेकांना मिळता मिळत नाहीत, तसेच इंदोरीकरांच्या किर्तनाच्या तारखा महिनेच्या महिने पुढे बूक असातात. मात्र आज इंदोकरांच्या चाहत्यांना निराश करणारी तसेच चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. कारण तब्येतीच्या कारणास्तवर इंदोरीकर महाराजांनी काही दिवस ब्रेक घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे.


काही दिवस कार्यक्रम रद्द
इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी हा सल्ला इंदोरीकरांना दिला आहे. हभप निवृती महाराज देशमुख यांचे अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम नियोजित होते. मात्र आता आयोजकांची गैरसोय होणार असल्याने इंदोरीकर महाराजांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे. तसे दिलगिरी व्यक्त करणारे पत्रकही त्यांच्याकडून काढण्यात आले आहेत. इंदोरीकरांचा हा ब्रेक खूप काळ नसणार आहे. ते पुन्हा सर्वासमोर किर्तनाला उभे राहताना दिसून येणार आहेत. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत असेल असे इंदोरीकरांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र काही दिवस तरी त्यांची किर्तन आता बंद असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -