ताजी बातमी ऑनलाईन टीम
कर्जत तालुक्यातील शिंदे येथे जेसीबीने जुने घर पाडताना शंभर वर्षांपूर्वीची धातूची नाणी आढळून आली. सुरेश हरकचंद भंडारी यांच्या मालकीच्या जुन्या वाड्याची इमारत खाली करण्याचे काम सुरू असताना जेसीबी चालक व कामगारांना ही नाणी आढळून आली. यानंतर महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली.
कर्जत तालुक्यातील शिंदे येथे बांधकामासाठी जुन्या घराचे खोदकाम जेसीबीद्वारे सुरू होते. त्यावेळी नाणी वाजल्याचा आवाज झाला. तेथे पाहिले असता एक छोटी चरवी आढळून आली. त्यामध्ये 1918, 1919 सालातील भारतीय चलनातील पाच नाणी आढळून आली. ही माहिती समजताच शिंदे गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. नाणी पाहण्यासाठी आणि छायाचित्रे घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. याची माहिती पोलिस प्रशासनाला कळविण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली. त्यानंतर पोलिस व महसूल विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. वास्तविक पाहता याठिकाणी अवघी पाच आणि शंभर वर्षांपूर्वीची साधी नाणी सापडली.