Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत कापडाने भरलेला ट्रक पेटला : जीवित हानी नाही, मात्र आर्थिक हानी...

इचलकरंजीत कापडाने भरलेला ट्रक पेटला : जीवित हानी नाही, मात्र आर्थिक हानी मोठी !

इचलकरंजीतील किसान चौक परिसरात आज कापडाच्या गाठीने भरलेल्या सुताच्या ट्रकला ईलेक्ट्रिक वायर चा स्पर्श लागून शॉर्टसर्किटने ट्रकला आग लागली. घटना किसन चौक परिसरातील लायकर मळा रस्त्यावरील घटना घडली.

शहरातील एका सूत गोडाऊन मधून कापडाच्या गाठी भरून ट्रक जात असताना ट्रक मध्ये ओव्हरलोड कापडाच्या गाठी भरल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक तारेला ट्रॅक्टर मधील कापडाचा ईलेक्ट्रिक तारेला स्पर्श झाला तारेचा व कापडाचा स्पर्श होऊन स्पार्किंग होऊन ठिणगी कापडाच्या गाठी मध्ये पडली. बगता बगता आगीने रौद्ररूप धारण केले त्याची माहिती काही नागरिकांनी ड्रायव्हरला दिली. ड्रायव्हरने गाडी सोडून पळ काढला तसेच काही नागरिकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली घटनास्थळी अग्निशमनच्या चार गाड्या दाखल झाल्या. आग विजावण्याचा मोठा प्रयत्न केला आणि आर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग विजावण्यात यश आले .

दरम्यान आज भर वस्तीतील लायकर मळ्यामध्ये कापडाच्या गाडी पेटल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत त्यामुळे अशा ट्रकवर कारवाई करावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -