ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर (Gujarat Titans vs Rajasthan Royals) 7 गडी राखून शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने (RR) गुजरात टायटन्ससमोर (GT) 189 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने 7 गडी आणि 3 चेंडू राखून पूर्ण केले.
डेव्हिड मिलरच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर गुजरातने राजस्थानचा 7 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मिलरने 38 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 5 षटकार आणि 3 चौकार लगावले. गुजरातला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती आणि मिलरने प्रसिद्ध कृष्णाला (Prasiddha Krishna) पहिल्या 3 चेंडूत 3 षटकार मारून विजय मिळवून दिला. मिलरशिवाय कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 40 धावा केल्या. शुभमन गिल (35) आणि मॅथ्यू वेड (35) यांनी उत्कृष्ट खेळी केली.