ताजी बातमी ऑनलाईन टीम
एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाणे हद्दीतील सुरज रमेश काळे टोळी 1 वर्षाकरीता सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.या तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी केले आहेत.
एमएमआयडीसी कुपवाड पोलिस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख सुरज रमेश काळे वय वर्षे २४ राहणार जुना बुधगाव रोड रेणुका मंदीर जवळ कुपवाड, राजअहमद मेहबूब शेख वय वर्षे २१ राहणार रामकृष्णनगर कुपवाड,नितेश उर्फ नितिन कल्लाप्पा कोष्टी वय वर्षे २६ राहणार लिंगायत गल्ली कुपवाड,आकाश उर्फ लोकेश लक्ष्मण जाधव वय वर्षे २२ राहणार रोहीणी कोल्ड स्टोअरेज मागे कुपवाड या टोळी विरुद्ध २०१४ ते २०२१ मध्ये जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर जमाव करुन मारामारी करणे,जबरी चोरी करणे,आर्थिक फायद्यासाठी जीवे मारण्याची धमकी देणे,असे शरिराविरुध्द आणि मालमत्तेविरुध्द गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद आहेत.
यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा ५५ अन्वये सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून 1 वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.