Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगपोस्टाच्या या योजनेत गुतवणूक करून मिळवा दुप्पट परतावा; जाणून घ्या काय आहे...

पोस्टाच्या या योजनेत गुतवणूक करून मिळवा दुप्पट परतावा; जाणून घ्या काय आहे योजना?

ताजी बातमी ऑनलाईन टीम
तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असेल जिथे पैसे सुरक्षित असतील आणि नफा (Return) देखील चांगला असेल तर पोस्ट ऑफिस (Post Office) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक हा तुमच्यासाठी शून्य जोखीम गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक हवी असेल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजनेत गुंतवणूक करू शकता.



किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Scheme) ही भारत सरकारची वन टाईम गुंतवणूक योजना आहे. या योजनेअंतर्गत तुमचे पैसे ठराविक कालावधीत दुप्पट केले जातात. किसान विकास पत्र योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी सध्या 124 महिने आहे. यामध्ये गुंवणूकीची किमान मर्यादा 1000 रुपये आहे तर योजनेत गुंतवणूकीची कमाल मर्यादा नाही. किसान विकास पत्र (KVP) मध्ये प्रमाणपत्रांच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते. 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतची प्रमाणपत्रे आहेत जी खरेदी केली जाऊ शकतात.

या योजनेत गुंतवणूकीची मर्यादा नाही, त्यामुळे मनी लाँडरिंगचा धोका देखील आहे. त्यामुळे सरकारने 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड (PAN Card) अनिवार्य केले आहे. यासोबतच आधार कार्ड (Aadhaar Card) ओळखपत्राच्या स्वरूपातही (Identity Card) द्यावे लागेल. जर तुम्ही या योजनेत 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आयटीआर, वेतन स्लिप आणि बँक स्टेटमेंट सारख्या उत्पन्नाचा पुरावा देखील सादर करावा लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -