Thursday, July 24, 2025
Homeसांगलीसांगलीत सिलिंडरचा साठा जप्त

सांगलीत सिलिंडरचा साठा जप्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील कोल्हापूर रस्त्यावर खिलारे मंगल कार्यालयाजवळ एका दुकान गाळ्यात बेकायदा घरगुती सिलिंडराचा साठा करून त्यातील गॅस रिक्षामध्ये भरून देणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी दुपारी छापा टाकला.



छाप्यामध्ये मुख्य संशयितांसह सहा रिक्षाचालकांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 19 सिलिंडर, गॅस भरून देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार इलेक्ट्रीक मोटारी, पाच रिक्षा व चार वजन काटे, असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



अटक केलेल्यांमध्ये मुख्य संशयित सिद्धिविनायक सदाशिव देशिंगे (वय 32, रा. नदीवेस, पवार गल्ली, मिरज), सूरज बाळू काटकर (वय 22), रिक्षाचालक कौशल संजय जाधव (वय 20), राकेश विनायक कांबळे (वय 21), वजीर नियामत जमादार (वय 20, चौघे रा. शामरावनगर, सांगली), संजय ऊर्फ सचिन रमेश पवार (वय 38, रा. संजयनगर सांगली), नागेश तुकाराम ऐवळे (वय 32, रा. पत्रकारनगर सांगली), अमित आप्पासाहेब तांदळे (वय 30, रा. गजराज कॉलनी, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार आर्यन देशिंगकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -