Monday, May 27, 2024
Homenewsमोदींनी साडेपाच लाख दिलेत, मी पैसे परत करणार नाही"

मोदींनी साडेपाच लाख दिलेत, मी पैसे परत करणार नाही”बिहारच्या खगडिया एक विचित्र प्रकार समोर आलेला आहे. रणजीत दास या व्यक्तीच्या बॅंक खात्यामध्ये अचानक साडेपाच लाख रुपये आले. त्या व्यक्तीला वाटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या खात्यात साडेपाच लाख पाठवले आहेत. ती व्यक्ती म्हणाली की, “पंतप्रधान मोदींना सांगितलं होतं की, प्रत्येकाच्या खात्यात पैसे पाठवणार आहोत.

मोदींनी दिलेल्या वचनामुळेच ही रक्कम माझ्या खात्यात आली आहे, असा समज करून खात्यात आलेली साडेपाच लाख रक्कम खर्च करून टाकली. पण, नंतर लक्षात आले की हा प्रकारच काही वेगळा आहे. त्याच्या कृतीमुळे त्याला पोलीस तुरुंगात पाठविण्याच्या तयारीत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, बॅंकेकडून चुकून रणजीत दास नावाच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये साडेपाच लाख रुपये टाकले. बॅंकेच्या जेव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी रणजीत दासला पैसे परत पाठविण्यास सांगितले. पण, इतकी मोठी रक्कम आल्यामुळे खातेदाराने सर्व रक्कम खर्च करून टाकली.

खातेदाराला वाटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही रक्कम बॅंकेत पाठवली आहे. बॅंकेने कित्येकवेळा ही रक्कम परत करण्याच्या नोटीस पाठवल्या. तरीही त्याने ही रक्कम पाठवली नाही. तर बॅंकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रणजीत दास यांनी ताब्यात घेतले.

ग्रामीण बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “रणजीतच्या खात्यामध्ये चुकून हे साडेपाच लाख रुपये गेले. पण, नंतर आमच्या लक्षात ही चूक आली. त्यानंतर रणजीतकडे वारंवार पैशांची मागणी केली. पण, तोपर्यंत रणजीतने खात्यातून ही सर्व रक्कम काढून घेतली होती. ज्यावेळी रणजीतशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले की, ही रक्कम मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवली आहे. त्यामुळे ही रक्कम परत करणार नाही. तेव्हा बॅंकेने त्याची तक्रार पोलिसांत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -