Sunday, November 3, 2024
Homeकोल्हापूरकर्ज मंजूर झालेले पैसे न दिल्याने माजनाळच्या तरुणाची आत्महत्या

कर्ज मंजूर झालेले पैसे न दिल्याने माजनाळच्या तरुणाची आत्महत्या



आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होऊनही जिल्हा बँकेच्या पुनाळ शाखेने कर्जाची रक्कम न दिल्याने माजनाळ (ता. पन्हाळा) येथील जय बाळासाहेब डवंग (वय 23) या तरुणाने 20 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती.

या प्रकरणी जिल्हा बँकेच्या पुनाळ शाखेतील बँक निरीक्षक राजेंद्र आनंदा बेलेकर (रा. कळे) व शाखाधिकारी नामदेव गुंडा खोत (रा. खोतवाडी) या दोघांवर कळे पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) गुन्हा दाखल झाला.

याबाबत जयचे वडील बाळासाहेब भिवा डवंग यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, जय डवंग याने जिल्हा बँकेच्या पुनाळ शाखेमध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत 10 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण सादर केले होते. 24 मे 2021 रोजी बँकेने कर्ज मंजूर केले आणि 24 जुलै रोजी जयच्या सेव्हिंग खात्यावर रक्कम जमा केली होती.


मात्र त्या रकमेची उचल करण्यासाठी जय बँकेत गेला असता बँक निरीक्षक व शाखाधिकार्‍यांनी कोणतेही ठोस कारण नसताना वेळोवेळी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यामुळे जय तणावात गेला व त्याने 20 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले. 23 रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान जयचा मृत्यू झाला.

उत्तरकार्य विधी पूर्ण झाल्यानंतर जयच्या वडिलांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -