Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगTerror Funding Case: यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, एनआयए कोर्टाने ठोठावला 10 लाखांचा...

Terror Funding Case: यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, एनआयए कोर्टाने ठोठावला 10 लाखांचा दंड

ताजी बातमी ऑनलाईन टीम

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला एनआयए कोर्टाने (NIA Court) टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने यासिन मलिकला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. फुटीरतावादी नेत्याला दोन कलमांत जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावण्यात आली आहे. मलिकला ही शिक्षा आयपीसीच्या कलम 121 (देशाविरुद्ध युद्ध पुकारणे) आणि दुसऱ्या UAPA चे कलम 17 अंतर्गत सुनावण्यात आली आहे.



यासीन मलिकला शिक्षा सुनावली जात असताना काश्मीरमध्ये (Kashmir) सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. खबरदारी म्हणून श्रीनगरमध्ये ( Srinagar) इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्यात आली होती. दुसरीकडे यासीन मलिकच्या घरावर (Yasin Malik’s house) ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. एवढेच नाही तर दिल्लीतील न्यायालयाच्या आवारातील (court premises) सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडेकोट होती. न्यायलयाच्या आवारात निकालापूर्वी श्वानपथकांमार्फत पाळत ठेवण्यात आली होती.



सर्व आरोप स्वीकारले
शिक्षा सुनावण्यापूर्वी कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. याआधी यासिन मलिकने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले होते. मलिकने न्यायालयात सांगितले की, 28 वर्षांची माझी राजकीय कारकीर्द आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणाचा सहभाग होता हे स्पष्ट झालेले नाही. मी शिक्षेत सवलत घेणार नाही. कोर्टाला योग्य वाटेल ती शिक्षा द्यावी. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना माझा विरोध नाही असे मलिकने न्यायालयाला सांगितले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -