ताजी बातमी ऑनलाईन टीम
गवा अचानक आडवा आल्याने मोटारीला धडक बसून चालक जखमी झाला. आजरा. गडहिंग्लज मार्गावर काल सायंकाळी ही घटना घडली. अजित राजाराम सुतार (वय ४०, पिंपळगाव, ता. भुदरगड) असे जखमीचे नाव आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मोटारीचे नुकसान झाले आहे. श्री. सुतार सावंतवाडीला गेले होते. तेथून मोटारीतून गावाकडे परतत असताना सुलगाव रोपवाटिका ओलांडून पुढे गेल्यावर अचानक गवा मोटारीच्या आडवा आला.
प्रसंगावधान राखत सुतार यांनी गाडीचा वेग कमी केला. या वेळी गव्याने दोनही पाय बॉनेटवर ठेवून चालकाच्या बाजूकडून एक पाय सुतार यांच्या छातीवर लावला. गव्याच्या धडकेमुळे मोटारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही घटना अन्य वाहनचालक पाहत थांबले. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे