Sunday, December 22, 2024
Homeसांगलीकौटुंबिक वादातून डॉक्टर महिलेस मारहाण केल्याबद्दल चार जणांचे विरुद्ध गुन्हा दाखल

कौटुंबिक वादातून डॉक्टर महिलेस मारहाण केल्याबद्दल चार जणांचे विरुद्ध गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कौटुंबिक वादातून डॉक्टर महिलेस मारहाण केल्याबद्दल चार जणांचे विरुद्ध विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी डॉक्टर मनीषा विनायक वरळे , वय 39 वर्ष , राहणार दत्तनगर विश्रामबाग या डॉक्टर महिलेस कौटुंबिक वादातून संशयित आरोपी पृथ्वीराज नमेथे , संबंधित महिलेचे सासरे पुरुषोत्तम वरळे , ननंद शिल्पा , ननंदेचा पती विवेक निकम यांनी डॉक्टर मनीषा वरळे या राहत असलेल्या बंगल्यामध्ये प्रवेश करून बंगल्यावर कब्जा करण्यासाठी त्यांना वरील संशयित आरोपीनी शिवीगाळ करून मनीषा यांच्या पायावर लोखंडी सळईने मारहाण केली आहे .


यामध्ये मनीषा यांचे करंगळी जवळ हाड फ्रॅक्चर झाले आहे . तसेच त्यांच्या मुलीला डांबून ठेवले आहे तसेच सासरे नणंद व ननंदेच्या पतीने बंगल्यातील संसारोपयोगी साहित्य, डायनिंग टेबल ,परस्पर विकून आलेल्या रकमेचा अपहार केला आहे . याबाबत डॉक्टर मनीषा यांनी वरील आरोपींच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली असून विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -