ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगलीतील कर्नाळ येथील भोसले गार्डनमध्ये लग्न का प्रसंगी दागिन्यांची पर्स चोरणारा सराईत चोरटा गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले. इम्तियाज मुमताजहुसैन अन्सारी (वय ४५ रा. यड्राव फाटा, इचलकरंजी) असे सदर आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील दागिने आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिरज तालुक्यातल्या – इनामधामणी येथील सौ. स्वाती गायकवाड र या नणंदेच्या मुलाच्या लग्नासाठी भोसले गार्ड न या मंगलकार्यालयात शनिवारी (दि.१४) मे रोजी गेल्या होत्या. २५ हजार रुपये आणि त्यांचे सोन्याचांदीचे दागिने त्यांनी पर्स मध्ये ठेवले होते. काही कामानिमित्त त्यांनी आपली पर्स वर पक्षाच्या खोलीत ठेवली. यादरम्यान सदर पर्सवर पाळत ठेवून असलेल्या अन्सारी याने पर्स लंपास केली.
पर्स लंपास झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी सुद्धा तातडीने पावले उचलत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीसांना माहिती मिळाली कि, एक व्यक्ती मोटारसायकल वरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येत आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकाने कोल्हापूर रोडवरील धामणी फाटा येथे सापळा लावला. त्याला कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले.