ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंधन दरवाढीने (Petrol Diesel Price) सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले असताना येत्या 31 मे रोजी पेट्रोल पंप डीलर्स संपाचे हत्यार उपसणार असल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कमीशन / मार्जिन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. परिणामी या दिवशी इंधन खरेदीही बंद असणार आहे. त्यामुळे या दिवशी पेट्रोल पंपावर खडखडाट असणार आहे. परिणामी वाहनधारकांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात क्रमश: 8 आणि 6 रुपयांची कपात केली होती. या निर्णयानंतर राज्य सरकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवरी व्हॅट कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात 31 मे या दिवशी कोणत्याही प्रकारची इंधन खरेदी न करता पेट्रोल पंप डीलर्सनी संपाची हाक दिली आहे.
पेट्रोल-डिझेलवरील कमीशन / मार्जिन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पेट्रोल पंप चालक-मालक संघटनाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.