ताजी बातमी ऑनलाईन अर्ज
जगात झपाट्याने वाढत असलेल्या मंकीपॉक्स ( Monkeypox ) आजारामुळे सरकारसह जनताही चिंतेत आहे. भारतात या विषाणूने बाधित एकही रुग्ण आढळून आला नसला तरी बचावासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क होत उपायोजना सुरु केल्या आहे. अशातच देशातील एका प्रमुख कंपनीने या आजाराची तपासणी करण्यासाठी RT-PCR किट लॉन्च केली आहे. लवकरच ही किट बाजारात उपलब्ध होणार आहे.
तात्काळ मिळणार रिपोर्ट –
औषधी उपकरण निर्माण करणाऱ्या या कंपनीने शुक्रवारी या टेस्ट किटबद्दल माहिती जाहीर केली. कंपनीने सांगितले की, त्यांनी मंकीपॉक्सची रिअल टाईम रिपोर्ट देणारी टेस्ट कीट विकसित केली आहे. या किटच्या वापराने तात्काळ लक्षात येईल की, रुग्णाला ऑर्थोपोक्स व्हायरस म्हणजेच मंकीपॉक्सचे लक्षण आहे किंवा नाही.
चार रंगात बनवण्यात आली आहे कीट –
रिपोर्टनुसार ट्रिव्हिट्रोन हेल्थकेअरच्या संशोधन आणि विकास टीमने ही RT-PCR किट बनवली आहे. ही कीट चार रंगात बनवण्यात आली आहे. प्रत्येक रंगात एक विशेष फ्लेवर वापरण्यात आलेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सिंगल ट्यूबमध्ये स्वॅबद्वारे ही तपासणी होईल. यामुळे चेचक किंवा मंकीपॉक्सचा सहज तपास लागेल. या संपूर्ण प्रक्रियेला 1 तास लागेल.