ताजी बातमी ऑनलाईन टीम
कंगना राणावतचा ‘धाकड’ बरोबरच अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘भूल भुलैया २’ (Bhool Bhulaiyaa 2) रिलीज झाला होता. त्यामुळे ‘धाकड’ ला ‘भूल भुलैया २’ ने जोरदार टक्कर दिली. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५५.९६ कोटींची कमाई केली.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर आपटला. अआठव्या दिवशी या चित्रपटाची फक्त २० तिकिटे विकली गेल्याने ४ हजार ४२० रुपयांची कमाई झाली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स
ऑफिसवर फक्त ३ कोटी रुपये कमाई केली गेली आहे चित्रपटाच्या निर्मितीस सुमारे ८० ते ९० कोटी रुपये खर्च आला आहे. या सगळ्यावरून कंगनाचा हा चित्रपट महाफ्लॉप झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत मनोरंजन क्षेत्रातील आर्थिक विश्लेषक मानत आहेत.