Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगली; शेतातील रस्त्याच्या वादावरून दोन गटात राडा

सांगली; शेतातील रस्त्याच्या वादावरून दोन गटात राडा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

चार जण जखमी तर परस्परविरोधी पोलिसांत फिर्याद दाखल

जाधवमळा, वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा) येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान शेतातील रस्त्यामधील दगड जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढण्याच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. यामध्ये चार जण जखमी झाले असून परस्परविरोधी शिराळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.


याबाबत शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, वाकुर्डे बुद्रुक येथील वाकुर्डे बु! ते वाकुर्डे खुर्द येथील जाधव मळा नामक शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून शुक्रवारी शेतातील रस्ता करत असताना दोन गटात मारामारी झाली. या भांडणांमध्ये २५ हून अधिक महिला आणि पुरूष सहभागी होते. त्यामुळे या सर्वांनी मिळून एकमेकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात वनिता बाळासाहेब जाधव (रा मादळगांव, वाकुर्डे बुद्रुक) यांनी पोलिसात फिर्याद दिली असून मारहाणीत रघुनाथ ज्ञानु जाधव, आक्कासाहेब जाधव हे दोन जण जखमी झाले असून जिना बाळासाहेब जाधव यांच्यासह सुमारे अकरा जणांनी मारहाण केल्याची फिर्याद रि ^ पोलिसांत दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -