Friday, July 25, 2025
Homeब्रेकिंगमिरजेत क्रिकेट बेटिंगमधून दोन गटात तुफान राडा : घरावर दगडफेक, दोघांना अटक

मिरजेत क्रिकेट बेटिंगमधून दोन गटात तुफान राडा : घरावर दगडफेक, दोघांना अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरज : शहरात क्रिकेट बेटिंगमधील पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादावादीतून दोन गटात तुफान राडा झाला. यातून एकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावेळी झालेल्या झटापटीत एकाच्या डोक्यात धारधार हत्याराने हल्ला करण्यात आला. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.


याप्रकरणी विश्वेश धोंडीराम घोडके याने लायक उर्फ लियाकत जावेद इनामदार याच्यासह क्लब चालक मुजाहीद मुतवल्ली, बापू उर्फ नावीद शरिकमसलत, गोगा उर्फ शाहिद मुल्ला आणि नईम शरिकमसलत (सर्व रा. मुजावर गल्ली, मिरज) या पाच जणांविरुद्ध घरावर दगडफेक, मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तर लायक उर्फ लियाकत जावेद इनामदार याने विश्वेश घोडके याच्यासह अन्य दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.


याप्रकरणी पोलिसांनी विश्वेश घोडके आणि नावीद शरिकमसलत या दोघांना अटक केली होती. संशयितांना आज री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विश्वेश याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याने त्याला १ जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायायाने दिले. नावीद शरीकमसलत याला जामीन मंजूर झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -