Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाGT vs RR Final IPL 2022: गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगामात मिळवले...

GT vs RR Final IPL 2022: गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगामात मिळवले विजेतेपद, राजस्थानचा 7 विकेटने पराभव

ताजी बातमी ऑनलाईन टीम

IPL 2022 च्या विजेतेपदाच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मोठा विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात जेतेपद पटकावणारी गुजरात सातवी फ्रँचायझी ठरली आहे. शुभमन गिलने विजयी षटकार ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला. कर्णधार हार्दिक पंड्या सामन्याचा हिरो ठरला. आधी गोलंदाजीत त्याने तीन बळी घेतले आणि नंतर फलंदाजी करताना बॅटमधून 30 चेंडूत 34 धावांची खेळी केली.


हार्दिक पांड्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान संघ जेतेपदाच्या सामन्यात केवळ नऊ गडी गमावून केवळ 130 धावा करू शकला. हार्दिकच्या झंझावातासमोर राजस्थानचे सर्व मोठे फलंदाज फ्लॉप ठरले. त्याने प्रथम संजू सॅमसनला झेलबाद केले. यानंतर लगेचच जोस बटलरलाही 39 धावांवर बाद केले. शिमरॉन हेटमायर मधल्या फळीत राजस्थानच्या धावांचा वेग वाढवेल अशी अपेक्षा होती पण हार्दिकने त्याचीही विकेट घेतली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने रियान परागला बोल्ड केले. साई किशोरनेही दोन गडी बाद केले.


आयपीएलच्या या हंगामात पहिल्यांदा उतरलेला आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करून फायनलपर्यंत धडक मारणारा गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील या संघाने शानदार खेळी करत आयपीएल 2022 ची ट्रॉफी उंचावली. दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात राजस्थानने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत (IPL 2022 Final) धडक मारली होती. याआधी या संघाने 2008 मध्ये एकमेव अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी या संघाने पहिले विजेतेपद पटकावले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -