ताजी बातमी ऑनलाईन टीम
केंद्र सरकारकडून ( Government ) घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता 1 जूनपासून काही नियमांमध्ये बदल ( Rule Changes from 1st June ) होणार आहेत. हे नियम बँकिंग ( Banking), विमा ( Insurance ) आणि इतर आर्थिक गोष्टींशी संबंधित असणार आहे. या नवीन नियामांमुळे आता नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. त्यानुसार जाणून घ्या जून महिन्यापासून नवीन नियमांनुसार काय बदल होणार याविषयी सविस्तर माहिती…
गृह कर्जावरील व्याजदर वाढणार
स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. वाढीव रेटनुसार हा रेट आता 7.05 टक्के इतका होईल. तर, आरएलएलआर 6.65 टक्के प्लस सीआरपी असणार आहे.
विमा होईल महाग
केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी वाहन विमा प्रीमियम दरवाढीला मंजुरी दिली आहे. नवीन नियमांनुसार 1 जून 2022 पासून थर्ड पार्टी विमा महागणार आहे. यामुळे तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनांना हा नियम लागू असणार आहे.
इंजिनच्या क्षमतेनुसार प्रीमियम
या पूर्वी 2019-2020 मध्ये वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्यात आली होती. नव्या नियमानुसार आता 1000 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांना थर्ड पार्टी विम्यासाठी 2,094 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. तर, 1000 सीसी ते 1500 सीसी कारसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियम 3,416 रुपये करण्यात आला आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त वाहनांच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियमसाठी आता 7,897 रुपये मोजावे लागतील. तर दुचाकींच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियमबाबत अधिसूचनेनुसार, 1 जून 2022 पासून, 150 सीसी ते 350 सीसीपर्यंतच्या बाईकसाठी 1,366 रुपये आकारले जातील. तर 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठी विमा प्रीमियम 2,804 रुपये निश्चित करण्यात आला आहे.