Friday, July 25, 2025
Homeसांगलीशंभर फुटी रोडवर हातगाडी मालकाचा खून

शंभर फुटी रोडवर हातगाडी मालकाचा खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली शहरात पुन्हा एकदा खूनाचे सत्र सुरू झाले आहे. रविवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंप नजीक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या समोरच्या बाजूला असणाऱ्या माऊली एग्ज जंक्शनच्या हातगाडी मालकाचा खून करण्यात आला आहे. खून झालेल्या हातगाडी मालकाचे नाव संतोष तुकाराम पवार (वय २८ रा. मोती चौक सांगली) असे आहे. अंडा बुर्जी करण्याच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विश्रामबाग पोलीसांनी तात्काळ या घटनेची दखल घेवून संशयितांचा शोध सुरू केला आहे.



सांगली शहरात चारच दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून फाळकूटदादा तुकाराम मोटे याचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी सांयकाळी पुन्हा एका युवकाचा खून झाला आहे. शंभरफुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंपाच्या नजीक असणाऱ्या माऊली एग्ज जंक्शन येथे दोघे युवक आले आणि त्यांची आणि माऊली एग्जचे मालक संतोष पवार यांच्याशी वादावादी झाली. या वादावादीतून या दोघांनी या हातगाड्यांचे नुकसान करण्यास सुरवात केली याला विरोध करत असतानाच यातील एका युवकाने त्याच्याकडील चाकू काढला आणि थेट संतोष पवार यांच्या पोटात घुसविला बार इतका वर्मी होता की संतोष पवार हा खाली पडला त्यानंतर या दोघांनी तेथून पळ काढला शेजाऱ्यांनी तात्काळ जखमी संतोषला वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात आणले पण तत्पुर्वीच तो मयत झाला होता

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -