मिरज/ प्रतिनिधी
सांगलीतील फरारी आरोपीचा शोध घेत असताना आणि रात्री पेट्रोलिंग करत असताना विनायक सुतार,शिवाजी ठोकळ,रुपेश होळकर यांना त्यांच्या गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी समजली की सांगली,कोल्हापूर,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील एक वर्षाकरता हद्दपार केलेला आरोपी कृष्णा उर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे वय वर्ष 22 राहणार दसरा चौक उत्तर शिवाजी नगर सांगली हा उत्तर शिवाजी नगर दसरा चौक येथे थांबलेला असून त्याच्या अंगावर पिवळा रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असल्याचे सांगितले.
लगेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या स्टाफने सापळा रचून त्याला पकडले असता आणि नाव विचारले असता त्याने आपले नाव कृष्णा उर्फ मुदक्या कांबळे असे सांगितले. त्याला एक वर्षाकरता चार जिल्ह्यातून तडीपार केले असता तो पुन्हा सांगलीत आल्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे.