Saturday, April 13, 2024
Homeकोल्हापूरअकरावी प्रवेश अर्ज करण्यास अजूनही संधी

अकरावी प्रवेश अर्ज करण्यास अजूनही संधी


अकरावीसाठी प्रवेश घेण्याच्या अंतिम दिवशी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्यांपैकी 3979 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले. अकरावी प्रवेश निवड समितीने दुसर्‍या फेरीला प्रारंभ केला आहे. ज्यांना काही कारणामुळे अर्ज करण्याची संधी मिळाली नाही, त्यांना दुसर्‍या फेरीत अर्ज करता येणार आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी विज्ञान शाखेत 444 , कॉमर्स (मराठी) 194, कॉमर्स (इंग्रजी)139, कला (मराठी) 107, कला (इंग्रजी) 18 अशा एकूण 902 जणांनी प्रवेश निश्चित केला आहे. गेल्या आठ दिवसांत विज्ञान शाखेत 2061, कॉमर्स मराठी माध्यम 685, कॉमर्स इंग्रजी माध्यम 612, कला मराठी 571, कला इंग्रजी 50 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे. 17 ते 19 सप्टेंबर या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांना अर्जात बदल करणे, शाखा क्रम बदल करायचा आहे त्यांनी पूर्वीचा लॉगिन रद्द करून नवीन अर्ज प्रक्रिया शुल्कासह भरावयाचा आहे. ज्यांनी अजून ऑनलाईन प्रवेश घेतला नाही, ते विद्यार्थीही अर्ज करू शकतात.ज्या विद्यार्थ्यांना अर्ज रिजेक्टचा मेसेज आला आहे, त्यांनीही अर्ज करावेत. दि.20 तेे 21 या दोन दिवसांत प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे.

दि. 22 ते 24 सप्टेंबर निवड यादी तयार केली जाणार आहे. दि. 25 रोजी विद्यार्थ्यांची प्रवेश यादी महाविद्यालयात जाहीर केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कोणतेही महाविद्यालय मिळाले नसेल त्यांना दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -