Sunday, February 22, 2026
Homeसांगलीआटपाडीजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

आटपाडीजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे कराड – पंढरपूर महामार्गावर ट्रक आणि टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे ठार झाले. एकजण गंभीर जखमी झाला आहे. निखील ऊर्फ गणेश नानासाहेब फडतरे (वय 19), महेश विजय फडतरे (29, दोघे रा. सुलतानवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. निशांत बाबू फडतरे (19, रा. सुलतानावाडी) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी रात्री कराड – पंढरपूर महामार्गावर विभूतवाडीच्या पश्चिमेला सातारा जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढा आणि वळण रस्त्यावर हा अपघात झाला. कोरेगाव येथील शेतकरी कृषी यंत्र एजन्सीचा टेम्पो (एमएच 05 बीएच 3414) मालाची डिलिव्हरी करून परत निघाला होता. सातारा येथून दिघंचीकडे जाणाऱ्या ट्रकची (एमएच 09 सीए 0540) आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली.

विभूतवाडीजवळ वळण रस्त्यावरील पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त वाहनांतून जखमींना ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मायणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला. दुसऱ्याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. निशांत फडतरे याच्यावर सातारा येथील खासगी हॉस्पिटल उपचार सरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -