डिगो एअरलाइन्स कंपनीची सात महिने खंडित झालेली कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवा शुक्रवार (दि. 3) पासून पुन्हा एकदा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सुरु झाली.
कोल्हापूरचा उद्योग व्यापार वाढण्यासाठी कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवा सुरु व्हावी, अशी जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी तसेच काही संस्थांची मागणी होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी व विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांच्या प्रयत्नातून 22 फेब-वारी 2021 रोजी इंडिगोची कोल्हापू-अहमदाबाद विमानसेवा पहिल्यांदा सुरू झाली.
प्रवासी संख्याही चांगली असल्याने विमानसेवा अत्यंत चांगली सुरु होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरात, अहमदाबाद येथे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ही विमानसेवा मे 2021 मध्ये बंद केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात ही विमानसेवा सुरु झाली पण अहमदाबाद विमानतळ रनवे री-कारपेंटिंगमुळे इंडिगोची कोल्हापूर -अहमदाबाद विमानसेवा 1 नोव्हेंबर 2021 पासून बंद झाली होती.






