Saturday, February 21, 2026
Homeसांगलीतरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

मिरज/ प्रतिनिधी
लक्ष्मी नारायण कॉलनी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चार जणांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मयत जुबेर सलीम चौगुले वय तीस वर्ष याचे लग्न सुमया तिच्याबरोबर झाले होते.त्यांना सुबहान नावाचा मुलगा झाला होता.सुमया ही सासरच्या लोकांचे कोणतेही काम ऐकल्याने त्यांनी तिच्या घरच्यांना सांगून त्यांना बोलावून घेतले व सदरची बाब सांगितली.

यावेळी सुमयाचे वडील रमजान सय्यद सुमया ची आत्ती तसेच मोठ्या बहिणीचा नवरा मोहसीन शेख यांनी जुबेर व त्याचे वडील सलीम चौगुले याना तुम्ही आमच्या मुलीला व्यवस्थित सांभाळत नाही.तुम्ही मुलीला वारंवार कामे लावता आम्ही तिला तुमच्या घरी पाठवणार नाही.आम्हाला मुलगा नसल्याने सुबहान यास तुमच्याकडे कधी पाठवणार नाही असे सांगितले तसेच जुबेर यास मानसिक त्रास देऊन सुमय्या हीचा चुलत भाऊ मोहसीन हा संसार उध्वस्त करायचे धमकी देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून जुबेर सलीम चौगुले याने 30 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास राहते घराच्या खोलीमध्ये आत्महत्या केली होती.

याबाबत सलीम महम्मद चौगुले वय 59 वर्षे ,व्यवसाय खाजगी नोकरी राहणार लक्ष्मीनारायण सांगली यांनी आरोपी रमजान सय्यद मुलीची आती पूर्ण नाव माहित नाही व मोहसीन सय्यद सर्व राहणार उदगाव शिरोळ जिल्हा कोल्हापूर व मोहसिन शेख राहणार शंभर फुटी रोड सांगली यांच्याविरुद्ध जुबेर यास मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी कलम 306 , 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे ,सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -